सतत होणाऱ्या पित्ताच्या त्रासाने वैतागलात?१० उपाय – खवळलेले पित्त होईल शांत

सतत होणाऱ्या पित्ताच्या त्रासाने वैतागलात?१० उपाय - खवळलेले पित्त होईल शांत

सतत होणाऱ्या पित्ताच्या त्रासाने वैतागलात?१० उपाय - खवळलेले पित्त होईल शांत

पित्त झाल्यावर काय खावे

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे पित्त. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे रागाचा पारा चढणे. आंघोळ केल्यानंतर शरीराला दुर्गंध येणे इत्यादी लक्षणे आढळून आल्यास, आपले शरीर पित्त प्रकृतीत मोडते. अंगावर रॅशेज येणे, त्वचा लाल होणे, त्वचेला खाज सुटणे, ओठ-डोळे सुजणे असे या आजाराचे स्वरूप असते. पित्त दोष हा अग्नि आणि पाणी या दोन घटकांनी बनलेला असतो, जेव्हा शरीरात अग्नी वाढते, तेव्हा पित्त दोषाचा जन्म होतो.

निरोगी शरीरासाठी पित्ताचे संतुलन राखणे महत्वाचे आहे. यासंदर्भात, आरोग्य डाएट व न्यूट्रीशन क्लीनिकचे डायटीशियन डॉक्टर सुगीता मुटरेजा यांनी, पित्त दोष म्हणजे काय? व ते संतुलित करण्यासाठी कोणते घरगुती उपाय मदत करतील याची माहिती दिली आहे(Home Remedies for Pitta Dosha: Balance Pitta Naturally).

पित्त दोष म्हणजे काय?

आपले शरीर तीन गोष्टींनी बनलेले आहे. ज्यात वात, पित्त आणि कफ यांचा समावेश आहे. शरीरात यापैकी एक असंतुलित झाले की, विविध रोग उद्भवू शकतात. म्हणूनच आपण या तिघांना शांत आणि संतुलित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यास पित्त दोष वाढते, किंवा स्ट्रेस वाढल्यास पित्तदोषाचा जन्म होतो. पित्त दोषामुळे शरीरात अग्नीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ४० प्रकारचे रोग होऊ शकतात. कोणत्याही दोषाचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे हे इतर रोगांना आमंत्रित करते.

कंबर आणि पाठदुखीने छळलंय, पायाचे तळवे तर कमकूवत नाहीत? ४ उपाय, तळव्यांना द्या ताकद

शरीरात का वाढते पित्त दोष?

डॉक्टरांच्या मते, ”शरीरात पित्त दोष वाढण्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. यामध्ये अन्न, शारीरिक आणि भावनिक घटकांचा समावेश होतो. अधिक तिखट, आंबट, मसालेदार, खारट, तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात पित्त दोष वाढतो. कॅफीन युक्त पदार्थ, अल्कोहोल आणि निकोटीन खाल्ल्याने पित्त असंतुलित होते. भावनिक ताण किंवा अधिक व्यायाम केल्याने देखील पित्त वाढू शकते.

भजी-वडे तळून उरलेलं तेल पुन्हा वापरणं योग्य की अयोग्य? तळलेल्या तेलाचं करायचं काय?

पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय

1) पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा.

२) पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा.

३) पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे.

४) पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते. असे अनेक पोषक घटक त्यात आढळतात, जे पित्ताचे संतुलन राखण्यास मदत करतात.

५) पित्तदोषामुळे शरीरातील अग्नीचे प्रमाण वाढते, अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्याने ते शांत होऊ शकते.

६) पित्त दोष संतुलित करण्यासाठी आपण गुलकंद पिऊ शकता. याचा कूलिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे शरीरातील आग शांत होते.

७) शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढले की, आपण बडीशेप, व धणे मिक्स करून पाणी पिऊ शकता. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि धणे मिसळून भिजत ठेवा, व सकाळी त्याचे पाणी प्या.

8) पित्त दोष संतुलित करण्यासाठी पुदिन्याचे पाणी देखील उपयुक्त आहे.

9) मनुका पित्त दोष शांत करण्यास मदत करते. दुधात मनुके टाकून खा. याने शरीराला फायदा होतो.

10) भाज्यांमध्ये काकडी, शिमला मिरची, कडधान्य, पालेभाज्या, सोयाबीन आणि दुधीचा समावेश करा.

पित्त दोष शांत करण्यासाठी टिप्स

अंग मोडतंय? असह्य त्रास होतो? नसांचा कमकुवतपणा दुर्लक्ष करू नका, ५ व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा

– पित्त दोष संतुलित करण्यासाठी, आपण कडू, तुरट आणि गोड पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

– शरीरात पित्त वाढले असेल तर, जास्त व्यायाम करणे टाळा.

– मित्रांसोबत बोलून, आनंदी राहूनही ते शांत होऊ शकते.

– ध्यान केल्याने पित्त दोष संतुलित केला जाऊ शकतो.

– मार्जरी आसन, चंद्र नमस्कार, भुजंगासन आणि शवासन केल्याने पित्त दोष शांत होण्यास मदत होते.

This post was last modified on November 27, 2024 5:18 pm