मुंबई : 75 व्या प्रजासत्ताक दिनाला आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. प्रजासत्ताक दिन याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी ही बघायला मिळतंय. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील प्रमुख राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण देशभरात 26 जानेवारी (Republic Day India) हा जोरदार साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्य, अखंडतेचे प्रतीक आहे. शाळांमध्ये तर प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे. आता प्रजासत्ताक दिनाला अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. शासकिय आणि खाजगी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे.
प्रजासत्ताक दिन म्हटले की, भाषण आलेच. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच प्रजासत्ताक दिनी भाषण करायचे असते. आपल्या भाषणात नेमके काय काय मुद्दे यायला हवेत आणि आपल्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट कसा मिळेल, यावर सर्वांचा अधिक भर असतो. आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या भाषणासाठी काही खास टिप्स देणार आहोत.
Bạn đang xem: 26 जानेवारी भाषण मराठी 2024 : प्रजासत्ताक दिनासाठी भाषण करायचंय? मग ‘या’ टिप्स करा फाॅलो आणि मिळवा टाळ्यांचा…
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाची सुरूवात ही, श्रोत्यांचे आभार मानून करा, तसेच आपली स्वत:ची ओळख देखील करून द्या. कधीही प्रजासत्ताक दिनाचे भाषण करताना ही गोष्ट लक्षात घ्या की, आपले भाषण लांबलचक होणार नाही, याची काळजी घ्या. कधीही तुमचे भाषण हे अगदी छोटे आणि जबरदस्त असायला हवे.
Xem thêm : अर्जुन के 12 नाम (अर्जुन के 10 नाम) – Arjun Ke 12 Naam (Arjun Ke 10 Naam)
भाषणाच्या सुरूवातीलाच तुम्ही सर्वांचे आभार माना. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी गुलामीतून मुक्त झालाय. 1950 साली आपल्या देशात संविधान लागू झाले. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये कधीही लक्षात ठेवा की, आपल्याला इसवीसन हे लक्षात ठेवावे लागणार आहे. तारख्यांमध्ये अजिबातच गोंधळ व्हायल नको.
तुमच्या भाषणामध्ये 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांत आपल्या देशाची राज्यघटना तयार झाली हा मुद्दा देखील येऊ द्या. जर तुमचा तारख्यांमध्ये गोंधळ होत असेल तर मग तुम्ही तारख्यांचा फार जास्त उल्लेख करणे टाळाच. कारण तारख्यांमध्ये गोंधळ व्हायल नको. शेवटी उपस्थितांचे आभार मानून जय हिंद…म्हणत तुम्ही तुमचे भाषण थांबवा.
Nguồn: https://nanocms.in
Danh mục: शिक्षा
This post was last modified on November 20, 2024 2:41 am