मराठी भाषा दिन ‘२७ फेब्रुवारी’लाच का साजरा केला जातो? जाणून घ्या खरं कारण

मराठी भाषा दिन ‘२७ फेब्रुवारी’लाच का साजरा केला जातो? जाणून घ्या खरं कारण

मराठी भाषा दिन ‘२७ फेब्रुवारी’लाच का साजरा केला जातो? जाणून घ्या खरं कारण

27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन

मराठी भाषा ही महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे. अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. असेच एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर. मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर होते. देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी खूप काम केले होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निमित्ताने मराठी भाषेचा गौरव करण्याचेही राज्य सरकारने योजिले होते.

आणखी वाचा – भाषासूत्र : ‘युनिक’ मेसेज!

कुसुमाग्रज यांचा जन्म पुण्याला झाला होता पण ते नाशिकमध्ये वास्तव्याला होते. त्यांना सहा भाऊ आणि एक लहान बहिण होती. तिचे नाव कुसुम होते. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून त्यांनी कुसुमचा थोरला भाऊ (अग्रज – थोरला / मोठा भाऊ) यावरुन ‘कुसुमाग्रज’ या नावाचा वापर करायला सुरुवात केली. पाच दशकांपेक्षा जास्त असलेल्या त्यांच्या त्यांनी १६ खंड कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात खंड निबंध, १८ नाटके आणि सहा एकांकिका अशा कलाकृती लिहून प्रकाशित केल्या. १९८७ मध्ये त्यांना ज्ञानपीठ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला. विशाखा या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. वि.स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक आहेत.

आणखी वाचा – “…त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी”, राज ठाकरेंचं मराठी भाषिकांना आवाहन

ज्ञानपीठ, मराठी साहित्य अकादमी पुरस्कारासारख्या असंख्य पुरस्कारांनी त्यांचा गौरवण्यात आले आहे. १९९१ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले. एकूण कार्यकाळामध्ये ते मराठी भाषेच्या उन्नतीसाठी झटत राहिले.

This post was last modified on November 19, 2024 11:55 pm